कविता
कविता
1 min
241
कधी मनाला ही वाटते
अबोल रहावे ,
न बोलताही
खूप काही बोलावे.
कधी एकांतात , कातरवेळी
मन आठवणींनी भरून येई,
तर कधी कोलाहलात गर्दीतही
मन उंच गगनी भरारी घेई.
वेळी-अवेळी भावनांचे
मनी माजते काहूर,
अनेक भावना अन् कल्पना
शब्दरूप होण्यास आतुर
मनातल्या भावविश्वात
शब्दांचे रंगतात खेळ
विविध भावना अन् कल्पना
यांचा सुरेख मेळ.
असा हा मेळ जमल्यावर
शब्दांची मैफिल रंगते,
कवीमनात मग सुंदर
कविता साकारते.
