एका सैनिकाची प्रेमकथा
एका सैनिकाची प्रेमकथा
प्रेयसी माझी माझे स्फूर्तीस्थान
सदैव मला तिचा अभिमान
प्रथमदर्शनीच पडलो तिच्या प्रेमात
मग रोजच येऊ लागली ती स्वप्नात
अनेक नकारांती मिळाला तिचा होकार
प्रिये, आता तरी करी माझा स्वीकार
मंगलदिनी बांधली लग्नगाठ
आणाभाका घेतल्या , सदैव देण्याची साथ
प्रथम रात्रीच दिले तिला वचन
प्राणप्रिये, तुला दागिन्यांनी मढवीन
साथ असू दे तुझी सजने
दुष्मनाला नमवू जिंकू रणांगणे
एक नव्हे अनेक जन्म तुझ्यासाठी घेईन
प्रत्येक जन्मी, तुझ्याच मिठीत यावे मरण
हो प्रेयसीच ती, नाही सैनिकी गणवेश
तीच माझी शक्ती, तीच आवेश
