सुखाचे सोबती
सुखाचे सोबती
1 min
243
खोटी स्तुती करणाऱ्या
स्वार्थी जनांची गर्दी,
सुख समयी
जमे अवतीभवती,
खरंच यातली
तुझी म्हणाया किती?
वादळ येता,
पाला-पाचोळ्यापरी उडून जाती,
नको करू खंत,
हे सारे केवळ सुखाचे सोबती.
वादळातही घट्ट हात हाती,
ओळख जीवाभावाची नाती,
तेच खरे सुखदुःखाचे सोबती.
