Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Harsha Kumbhar

Others

3.8  

Harsha Kumbhar

Others

वर्षागीत

वर्षागीत

1 min
186


निळ्या अंबरी सावळे ढग दाटले,

 अंधारले सारे, नभ धरणीवर उतरले.


सरी बरसल्या, झाले नभीचे रांजण मोकळे,

 हिरव्यागार गालिच्यावर हिरे-मोती सांडले.


ऊन पावसाचे खेळ रंगले ,

आकाशाच्या पाटीवर इंद्रधनू उमटले. 


वाऱ्यासंगे दरवळे ओल्या मातीचा सुगंध,

 डोलू लागले वृक्षवेली होऊन मंत्रमुग्ध.


भिजल्या ओल्या मातीतून नवांकुर जन्मला ,

तरारली शेत-शिवार बळीराजा सुखावला.


धरणी नेसली हिरवा शालू नक्षीदार ,भरजरी ,

जणू, साजशृंगार करून नववधू नटली लाजरी.


झुळझुळणारे नदी-नाले गातात मंजुळ गाणी ,

नवजीवन अन् नवचैतन्य घेऊन आली वर्षाराणी. 


Rate this content
Log in