आईविना....
आईविना....
आईविना जग हे सारे अधुरे आहे.
कितीही श्रीमंत जाहलो तरी
तिच्याविना आपण भिकारीच आहे.
भल्याबुऱ्याची जाण करून देते आई
आयुष्यातला पहिला धडा
गिरवायला ही शिकवते आई.
घासातला घास भरवते आई
नऊ महिने पोटात वाढून
श्वासातला श्वासही देते आई.
चेहरा ही न पाहताचं आपल्यावर
निस्वार्थ प्रेम करते आई.
आपल्यासाठी जीवाची बाजी लावते आई.
नुसता चेहरा पाहून मनातले दुःख जाणते आई.
आपल्या जन्माच्या आधी नऊ महिने
उदरात ठेवते आपल्याला आई.
तीन वर्षे तर नुसत्या हातांवर
संभाळते आपल्याला आई.
आणि मरेपर्यंत तिच्या काळजात
आपल्याला जपते आई.
आईविना जग हे सारे अधुरे आहे
कितीही श्रीमंत जाहलो तरी
तिच्याविना आपण भिकारीच आहे.
माझी आई दुधावरील घट्ट साय
तिच्याविना मी काहीच नाय...
