नाचतो डोंबारी रे... नाचतो डोंबारी
नाचतो डोंबारी रे... नाचतो डोंबारी
उद्याच्या भाकरीची काळजी कशाला ?
आभाळ पांघरू अन दगड उशाला
ढम ढम ढोल वाजे ,झनंन झनंन झानंजरी
नाचतो डोंबारी रे ... नाचतो डोंबारी
भ्रमाचा भोपळा अपुला बरा
स्वप्नातच जगू अन भ्रमातच मरू
ढोल वाजे ढम ढम ,झनंन झनंन झानंजरी
नाचतो डोंबारी रे ... नाचतो डोंबारी
फाटकी झोळी ,फुटकी थाळी
आमुच्यासारखे आम्हीच असू
ढम ढम ढोल वाजे ,झनंन झनंन झानंजरी
नाचतो डोंबारी रे ... नाचतो डोंबारी
जात , धर्मावरून आप -आपसात भिडू
त्यांचे झेंडे , त्यांचे दांडे फुशारकीने मिरवू
ढम ढम ढोल वाजे ,झनंन झनंन झानंजरी
नाचतो डोंबारी रे ... नाचतो डोंबारी
कशाला हवं रोटी , कपडा मकान
नकोच पढाई लिखाई अन दवाई
ढम ढम ढोल वाजे ,झनंन झनंन झानंजरी
नाचतो डोंबारी रे ... नाचतो डोंबारी
आले बघा अच्छे दिन, झालोच आपण
विश्वगुरु अजून थोडं थांबा
ढम ढम ढोल वाजे ,झनंन झनंन झानंजरी
नाचतो डोंबारी रे ... नाचतो डोंबारी
भ्रमाचा भोपळा फुटणार कधी ?
की बघत बसणार फक्त तमाशा
ढम ढम ढोल वाजे, झनंन झनंन झानंजरी
नाचतो डोंबारी रे ... नाचतो डोंबारी
