साद
साद
साद होती मी दिली ती नार आता थांबली
काय झाला फायदा तू यार आता थांबली
तत्क्षणी मी मोकळे ते सोडले काळीजही
कापणारी काळजा कट्यार आता थांबली
दूर चंदा शोधतो शृंगारलेली चांदणी
चांदणीही ती विना शृंगार आता थांबली
चालताना तू अशी त्या ऐन वेळी भेटली
वेळ होती एकटी जी गार आता थांबली
एकमार्गी बंधने जी आपल्याला बांधली
त्याचवेळी वाटले तू फार आता थांबली

