अजुन किती वर्ष
अजुन किती वर्ष


किती वर्ष आणि किती काळ हा फक्त लढा देतच जगायचं,
भारत माझा असुन स्वतासाठी भीक मागुन खायचं..
दिलेल्या बलिदानला आज खर्या अर्थाने महत्त्वच उरलं नाही,
ज्यांच्या हाती आहे सत्ता त्यांनी खालच्या वर्गाचा विचार केलाच नाही..
उंच शिखरावर बसलेल्या राजा ला तळाची पायरी दिसतच नाही,
झिझुन झिझुन तीची माती झाली तरी तीचा विचार केलाच नाही...
देशाला दिलेले संविधान आणि मिळालेले हक्क सत्ताधारी सभेत मानत नाहीत,
आणि त्याचं सत्ताधारी साठी आपण जनता उरावर झेंडा फडकल्याशिवाय राहत नाही.
ह्या मु्र्खापणासारखं दुसरं लक्षणं अख्ख्या जगात नाही.