आयुष्याची मजा...
आयुष्याची मजा...
1 min
190
मेल्या नंतर भिंतीवर टांगलेल्या फोटोला ही बघता येत नाही,
कोण-कोण रडतंय आणि झुरतय हे जाणवत सुद्धा नाही.
नाही राहत मागे अस्तित्व आणि काया राख झाली
अंगाची तीही वाहतात नदिच्या प्रवाहात.....
मग का आत्महत्या करुन आयुष्य तुझं संपवतो गड्या,
कुणा वाचुन कुणाला या जगात फरक पडत नाही वेड्या.
न थांबणारा वेळ हा तुझ्या वाचुन जगायला शिकवुण जातो,
आणि,
तु कोणत्या भ्रमात आपला जीव दुसऱ्यांसाठी गमावतो.
मानवरुपी मिळालेला जन्म पृथ्वीवर बहुमुल्यावान आहे,
वेळ जाईल समजायला पण,तोपर्यंत जगायला खरी मज्जा आहे....
