निसर्ग प्रेम
निसर्ग प्रेम
या क्षणी
मज दिसते आहे
आभाळ भरून आलेले
लाल केशरी रंगाचे
शेले भरजरी पाघंरलेले
या क्षणी
मज दिसते आहे
थवे पाखरांचे रांगेतले
भासते नक्षीदार तोरण
नभोमंडपी जणू विनलेले
या क्षणी
मज दिसते आहे
सुसाट वारे सुटलेले
पालापाचोळ्याने जणू
अंगण माझे नटलेले
या क्षणी
मज दिसते आहे
रूप भूमातेचे हसलेले
वाढू द्या ही वनसंपंदा
पर्यावरण पाहू या सजलेले
