ती बरसते
ती बरसते


ती बरसते
मनाच्या डोंगरावरून
आठवणींचे गाठोडे घसरत यावे तशी
ती बरसते
निपचित पडलेल्या एकट्या जीवाला
एक स्मितहास्य आणण्यासाठी
ती बरसते
माणसातल्या वेगवेगळ्या रंगांची
जाणीव करून देण्यासाठी
ती बरसते
साऱ्या प्रश्नांची उत्तरे जणू काही
तिच्यामधेच लपलेली आहेत हे ठामपणे सांगण्यासाठी
ती बरसते
माणसांच्या बोलण्याने सुन्न झालेल्या
कानाला तिच्या टप्टप् आवाजाने खेचून मनमुक्त भिजवण्यासाठी