आई...
आई...


जन्म दिला त्या मातेने,
तिच्याबद्दल काय बोलावे।
नऊ महिने त्रास घेणे,
हेच तिच्या नशिबी असावे।।
संस्कार दिले त्या मातेने,
तिच्याबद्दल काय बोलावे।
चांगले मूल जन्माला यावे,
हेच तिच्या प्रार्थनेत असावे।।
आशीर्वाद दिला त्या मातेने,
तिच्याबद्दल काय बोलावे।
सुखी राहो मूल तिचे,
हेच तिचे मागणं असावे।।
शिक्षण दिले त्या मातेने,
तिच्याबद्दल काय बोलावे।
मोठे व्हावे मूल तिचे,
हेच तिच्या डोक्यात असावे।।
लग्न लावले त्या मातेने,
तिच्याबद्दल काय बोलावे।
सून नाही मुलगी यावी,
हेच तिच्या मनात असावे।।