अंबा दर्शन
अंबा दर्शन
भाळी कुंकुम चंद्रकोर
अंबा माझी दिसे सुंदर
नाकात घातली हिऱ्याची नथ
अंबेला आणाया धाडीला रथ
हातात हिरवी काकण ल्याली
अंबा माझ्यासाठी धावत आली
आंबा नेसली गुलाबी साडी
बुट्ट्याची शाल वरून ओढी
अंबेच्या कानात लोंबती डूल
अंबेला वाहूया चाफ्याची फुलं
अंबेची चोळी हिरवीगार
अंबेच्या राऊळी नाचती मोर
अंबेची जोडवी रुपेरी छान
अंबेला देऊ पैठणीचा मान
पायीचे पैंजण छुन छुन वाजे
अंबेचे नाव त्रिभुवनी गाजे
अंबा ल्याली कंबर पट्टा
भक्तांच्या सार्या पूरपूरविते हट्टा
अशी अंबाबाई नयनी देखिली
पूर्वपुण्याई फळाला आली
