आमचे मागणे।
आमचे मागणे।
ना हिंदू बनू, ना मुसलमान रे।
आम्ही सारे मानव, हेची जाण रे।
ना देव मंदिरात, ना मश्चिदीत असती।
माणुसकीला फुलवती, मना मनाची नाती।
निळ्या, हिरव्या, भगव्या रंगात काय आहे?
माणसाच्या अंगात लाल रक्त ची वाहे।
संपवू आता भेद सारे, जाती धरमातील रे।
अल्ला, ईश्वर, बुध्द हेच शांतीचे प्रतीक रे।
नको जाती धरमाची बंधने,नको वैर भावना।
असे आमचे मागणे,
माणसाने माणसासी माणसासम वागणे।
