तो म्हणाला म्हणून...!
तो म्हणाला म्हणून...!
तो म्हणाला म्हणून...!!!!
सायंकाळी त्याच दर्शन घेतलं
एक मस्त पैकी फोटो काढला
आणि मी नेहमी प्रमाणे
घरी परत आलो...
विसरून गेलो संध्याकाळच्या
नेहमीच्या कामाच्या व्यापात
जेवण केले आणि निवांत
टीव्ही पहात आडवा झालो....
कधी डोळा लागला ते
माझे मलाच कळाले नाही
गारव्या मुळे हालचाल ही
फारशी काही झाली नाही....
रात्रीचा रखवालदार मी
मला झोपून कसे चालेल
उठलो लाईटची बटन बंद केली
आणि मोबाईल ऑफ करून पडी मारली...
हळूच साहेब नजरे समोर आले
दत्त म्हणून ठाम उभे राहिले
म्हणाले अरे फोटो कशाला काढलास
निदान चार ओळी तरी आठवण म्हणून लिही....
खरच ओशाळलो मी
एवढं कोण हल्ली हक्क गाजवतयं
हक्क म्हटल की सार संपलं
आणि भांडण झुंपलं...
प्रेम उतू गेलं रूप आठवलं
आणि लेखणी पाझरू लागली
त्याच्या माये साठी
शब्द शोधू लागली...
देवा सूर्य नारायणा चुकलो बाबा
तूच नारे माझ्या जीवनाचा गाभा
तुझ्यामुळेच ना रे ब्रह्मांडी अभा
तूच माझ्या रे सदा पाठी उभा...
