STORYMIRROR

Bharati Sawant

Classics

4  

Bharati Sawant

Classics

पाठीराखा माझा विठुराया

पाठीराखा माझा विठुराया

1 min
383

चंद्रभागेच्या या तीराला

जमला वारकऱ्यांचा मेळा

विठुनामाच्या या चरणी

गाव सारा झाला गोळा


गोळा झाला वारकरी

दिंडी घेऊनी खांद्यावरी

भगव्या पताका हातात 

विठू नामाचे संकीर्तन करी


करी विठू रुक्माईची सेवा

मायबाप असती वारकरी

देव सावळाच हा विठुराया

वसतो हृदयातल्या मंदिरी


मंदिरी चाले नित्य पूजाअर्चा 

भक्तीचा नाद पंढरीनाथाचा

संत वारकरी हे पंढरीत गोळा

विठू सावळा साऱ्या भक्तांचा


भक्तांचा विठू हरी वैष्णवांचा

भजिती पूजिती त्यालाच सारे 

टाळ-मृदुंगाची ही मिळे साथ

सगळीकडे नामस्मरणाचे वारे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics