STORYMIRROR

Sanjay Gurav

Classics

4  

Sanjay Gurav

Classics

आला पाऊस..

आला पाऊस..

1 min
50

आला आला पाऊस आला

होरपळल्या भूईला पान्हा आला

आटलेली आसवे आनंदाश्रू झाली

तरसलेल्या मीरेला कान्हा भेटला..


गंध मातीचा सुखद अंतरी भरला

अवजारे,बियाण्यांचा साठा उघडला

रुजव्याची आस माय धरतीला 

नव्या अंकुराचा जन्म सोहळा सजला


लपलेले जीव करीती कोलाहल आनंदे

पाटी-दप्तराचे कौतुक बाल मनाला

सणावळींचे पेव फुटले नव्या पाण्यागत

रानभाज्या अन चिंचोक्याचा बेत झाला


मनचिंब ,तनचिंब पावसात रानचिंब

सरीवर सरी अंगणी सारीपाट रंगला

मरगळ वाहून गेली खळाळत्या पाण्यात

राजा मनाचा आला आला पाऊस आला..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics