STORYMIRROR

Jyoti gosavi

Classics

4  

Jyoti gosavi

Classics

फोटो फ्रेम चे दुकान

फोटो फ्रेम चे दुकान

1 min
342

सहज चालले होते रस्त्यावरून

अचानक नजर गेली फुटपाथवर

फोटो फ्रेम च्या दुकानावर

सगळे फोटो मांडले होते


फुटपाथवर हारीने

विक्रेता त्यावरची धूळ

झटकत होता बारी बारीने

लक्ष्मी आणि मरियम माता


गळ्यात गळे घालून बसली होती

मक्केच्या फोटोपाशी

राधाकृष्ण हसले होते

शंकराच्या नागावर


गुरू गोविंद सिंगजी फिदा

छान आहे म्हणून हाताने

गणपती दाखवत होता अदा

शिवरायांच्या फोटो पाशी


बसले होते गौतम बुद्ध

शेजारीच रामराया आणि

मारुती सेवेला कटीबद्द

आंबेडकरांच्या फोटो शेजारी


झंकारत होती वीणाधारी

जी वसली होती त्यांच्या

जिव्हेवरी लेखणी वरी

विक्रेता घालून होता गोल टोपी


पण त्याने गोष्ट शिकवली सोपी

सारे देवधर्म त्याने

बसविले एका ओळीने

जे नांदत होते गुण्यागोविंदात

जे जमले त्याला ते आपल्याला

जमेल का उभ्या आयुष्यात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics