STORYMIRROR

Smita Murali

Classics

4  

Smita Murali

Classics

होळी

होळी

1 min
229

होळी पौर्णिमा घेवूनी

आला मास हा फाल्गुन

कपटी अवगुणी रुपाचा

जाळूया मनातला रावण


गोळा करुया गोवऱ्या

साजरी करु आज होळी

दारापुढे रचूनी गोवऱ्या

काढुया सुंदरशी रांगोळी


येतील सवाष्णी नटूनी

नैवेद्य घेवून पुरणपोळी

रागद्वेष जाळून आज

भस्म करेल ही होळी


होळीभोवती फेर धरुन

नाच गाण्यात मुले दंग

हर्ष उल्हास उधळीत 

आले रंगपंचमीचे रंग


राग द्वेषाची करु होळी

निर्मळ करु आपले मन

ऐक्यभावना नांदावी असे

साजरे करुया सारे सण!!!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics