हर्षोल्हास वसुंधरेचा
हर्षोल्हास वसुंधरेचा
धोधोधोधो गरजत बरसत
भुवरी पाउस तो आला .
पर्जन्य सुमनांच्या वर्षावाने
सरितांनाही पुर तो आला .
चिंब ओली झाली आज
लता व्रुक्ष आणि वेली .
हर्षोल्हासाने वसुंधरा
आज गाउ लागली गाणि--१--
वर्षां पासुनि ही प्रतिक्षा
तयाची केली होती .
लाखो नेत्रे चोहीकडे
आकाश न्याहाळत होती .
आखेरी धरणि वरती
पर्जन्यक्रुपा जाहली .
हर्षोल्हासाने वसुंधरा
आज गाऊ लागली गाणि --२--
दिनरात करीत प्रतिक्षा
त्या धुवाधार पावसाची .
न्हण्यासाठी धरणि त्यात
किती आसुसली होती .
आसवासाठी तेव्हा तिच्या
नेत्री उरले नव्हते पाणि .
हर्षोल्हासाने वसुंधरा
आज गाउ लागली गाणि--३--
व्रुक्ष आणिक वेली यांचे
होते रुप कोमेजया लागले .
काळयाआईच्या अंगावरचे
होते हिरवे तेजही लोपले .
पर्जन्यरुपाने तिला मिळाली
आज नव नवी संजिवणि .
हर्षोल्हाससाने वसुंधरा
आज गाउ लागली गाणि--४--
म्रुदगंध पावसाचा तो
दरवळे सारर्या भुवरी
यथेच्छ पर्जन्याने होई
सर्वत्र ही पाणिपाणि
अविश्रांत पर्जन्यात
दिसंरात्र ही नाहली
हर्षोल्हासाने वसुंधरा
आज गाउ लागली गाणि--५--
