क्षण पावसाळी...
क्षण पावसाळी...
ओल्याचिंब या पाऊसधारा ,
सोबती बेधुंदसा वारा
रोमांचित अंग सारे,
दाटे मनी गुलाबी शहारा...
ओथंबून झरे घन,
भिजे माती कण-कण
उल्हासित होई निसर्ग सारा
पावसाळी मोहरे क्षण...
दवात न्हाले रान,
शहारले फुल न पान
मोरपीस फिरे अंगावरी,
मंजुळ कोकीळ गान...
मन भटके पावसात,
नवा सुगंध शिवारात
नेसूनी हिरवा शालू,
बहरुनी जाई पायवाट...
पाऊस कोसळे आसवांचा,
गारवा मनी आठवांचा
करी सुखाची उधळण,
रंग नात्याला इंद्रधनुचा...
