Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Techmaster YourRaj Patil

Inspirational

3  

Techmaster YourRaj Patil

Inspirational

रक्षण वसूंधरेचे....

रक्षण वसूंधरेचे....

1 min
229


जाणुनी मोल जीवनाचे 

थांबवूया विद्रुपीकरण निसर्गाचे...

सोडूनी हाव स्वार्थीपणाची 

रक्षण करूया वसुंधरेचे...||धृ||


निळ्या निळ्या आकाशात

 स्वच्छंदी भिरभिरती पक्षी

 हिरव्यागार पानाफुलांची 

उमटते धरणीवर नक्षी 

मंजुळ गाणे ऐकत राहावे 

डोंगर कुशीतून वाहणाऱ्या नदीचे...

सोडूनी हाव स्वार्थीपणाची 

रक्षण करूया वसुंधरेचे...||१||


वृक्षसंपदा देणगी अमूल्य 

पाण्यावाचून भकास जीवन

नाते जपावे प्राणिमात्रांशी

निसर्ग राहिल पवित्र पावन 

टिपून घ्यावा सुगंध मातीचा

अगणित उपकार धरणी मायेचे...

सोडूनी हाव स्वार्थीपणाची 

रक्षण करूया वसुंधरेचे...||२||


आभाळाचा रंग पिऊनी 

सागरास ही कवेत घेऊया 

ठेवू वागणे शहाण्यासम इथे

संपत्तीस या प्राणपणे जपूया 

थांबेल विनाश पृथ्वीमातेचा 

कुंपण घालू आता मर्यादांचे...

सोडूनी हाव स्वार्थीपणाची 

रक्षण करूया वसुंधरेचे...||३||


टाळूया प्रदूषण, लावूया झाडे 

थांबवूया नाश पर्यावरणाचा 

जोडुया निसर्गाशी विशुद्ध नाते 

विचार ठेवूया भविष्यकाळाचा 

हातामध्ये हात गुंफुनी सारे

वैभव खुलवूया या सृष्टीचे...

सोडूनी हाव स्वार्थीपणाची 

रक्षण करूया वसुंधरेचे...||४||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational