बळ जगण्याचे...
बळ जगण्याचे...
मज जगण्याचे बळ मिळो
दुःख मनीचे कुणा ना कळो...धृ
आयुष्य विख प्याला जहरी
वादळवाटा अनंत लहरी
शरीर निर्गुण वात जळो…१
जीवन फसवा मोह भला
मीपण माझे लाभो मला
खडतर वाट सहज टळो...२
मलीन भावना कठोर नाती
अस्तित्वाच्या विझल्या वाती
मन निराशा आज ढळो...३
आभाळ कोरडे मंद सांज
व्याकुळ जगणे स्वप्न वांझ
गर्व द्वेष माझा गळो...४
