सारंच एकसारखं नसतं..
सारंच एकसारखं नसतं..
सारं आकाश हे एकसारखं,
तसे सारे हे नभही;
सारे मान्सूनी वारे एकसारखे,
तसे सारे इतर ऋतूही;
सारी वृक्षवेली ही एकसारखी,
तशी सारी राने, वनेही;
सारे दगडगोठे एकसारखे,
तशा साऱ्या ह्या पर्वतरांगाही;
सारे पाणी गोडे एकसारखे,
तसा खारा हा समंदरही;
सारे पशूपक्षी एकसारखे,
तसा सारा हा पसाराही;
सारं एकसारखं, सुरळीत वाटताना
तरी थोडीशी कुठंतरी घुसमटही..
सारं एकसारखं असावं, वाटावं
तशी सारी मानवजात एक नाही..
