STORYMIRROR

Aaditya Kadam

Romance

3  

Aaditya Kadam

Romance

हलकीशी एकदा...

हलकीशी एकदा...

1 min
191

हलकीशी लाट यावी

सारे अंग शहारून यावे,

हात हातात येता मग

घट्ट तुझ्या मिठीत शिरावे


सरीवर सर अंगास येता

तुज पांघरूण व्हावे,

पदरात लपूनआडून

नजरेनं सारं जग पाहावे


कुठे चहा, कणीस

भजीचा आस्वाद घ्यावा,

चिखलात पाय तुडवून

बालपणीचा आनंद लुटावा


कधी सागरकिनारी 

उभ्या नावेस गुज सांगावे,

कधी वादळवारा सोसत 

साऱ्या आयुष्याचे पारणे फेडावे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance