STORYMIRROR

Aaditya Kadam

Others

2  

Aaditya Kadam

Others

विठ्ठलास एक हाक

विठ्ठलास एक हाक

1 min
70

किती बोलावा विठ्ठल, किती पाहावा विठ्ठल।

किती सांगावा विठ्ठल, किती करावा विठ्ठल।।


किती धरावा विठ्ठल, किती सोडावा विठ्ठल। 

किती आठवावा विठ्ठल, किती विसरावा विठ्ठल।। 


किती टाळावा विठ्ठल, किती आर्जवावा विठ्ठल। 

किती सोसावा विठ्ठल, किती साठवावा विठ्ठल।। 


किती पेरावा विठ्ठल, किती उगवावा विठ्ठल। 

किती बहरावा विठ्ठल, किती सजवावा विठ्ठल।। 


किती सांगातीचा विठ्ठल, हा तर महतीचा विठ्ठल। 

आदि म्हणे विठ्ठला, अजून किती हाक द्यावा।।


Rate this content
Log in