STORYMIRROR

Aaditya Kadam

Children Stories Others Children

2  

Aaditya Kadam

Children Stories Others Children

हरवलेले एक बालपण..

हरवलेले एक बालपण..

1 min
13

हरवलेले बालपण आठवताना..

एक गोष्ट लक्षात राहते, ते म्हणजे! 

बालपण खरंच सुंदर होतं, मजेचं होतं.. 


बालपणी भेटलेली पहिली मैत्रीण, सायकल!

जिच्यावर स्वार होऊन गल्लीत हिंडायचो, 

बालपणातला पहिला मित्र, चेंडू! 

ज्याला मातीत तुंबवून मैदान गाजवायचो.. 


बालपणी सारंच आपलं असतं.. 

आपली शाळा, आपलं दप्तर

आपला वर्ग आणि आपली वही पेन्सिल!

कोणाकोणासोबत शेअर करायचो

आता नीटसं आठवतही नाही.. 


मास्तरांनी दिलेला मार, 

वर्गात केलेला पहिला सत्कार! 

पाच- सहा मार्क मिळवण्यासाठी 

मग मास्तरांशी केलेली कुस्ती!! 

सारंच कसं आता मिस होतंय.. 


शाळेतली पहिलीवहिली सहल!

किल्ले-गडांची घेतलेली दखल, 

तो महाराजांना पाहून केलेला मुजरा! 

मग छातीचा कोट करून 

मित्रांसोबत केलेली लुटूपुटूची लढाई! 

सारंच कसं आता मिस होतंय.. 


हरवलं ते बालपण.. हरवल्या त्या आठवणी! 

हरवले ते मित्र.. हरवली ती मैत्री!!


Rate this content
Log in