STORYMIRROR

Pradnya Ghodke

Classics

3  

Pradnya Ghodke

Classics

स्पर्धेसाठी कविता...विषय:-'आठवणीतील क्षण'...शीर्षक:- झोके घेती...!

स्पर्धेसाठी कविता...विषय:-'आठवणीतील क्षण'...शीर्षक:- झोके घेती...!

1 min
274

आठवणींच्या हिंदोळ्यावर,

मोती आठवांचे विसावतात..

गंधित स्पर्शाने त्या नकळत,

मने आनंदाने मोहरतात...! १.


आठवांनाही ठाऊक असतो,

अस्तित्वाचा क्षणिक काळ..!

तरी विसावूनी मन हिंदोळ्यावर,

विश्वासाची गुंफतो माळ...! २.


स्पर्श होता आठवणीतील क्षणांचा,

प्राक्तनही मग होते गंधित..!

क्षणभंगुर पण..सुंदर जीवन,

सार्थकतेने होते बंधित...! ३.


गोड क्षणांचे मनी दिलासे,

हळवांतूनी ते येती..

अबोल्यातूनही कधी मग ते,

मुग्ध आठवांत वाहती...! ४.


पळामागूनी पळ सरकती,

काळ क्षणांचा जाई पुढे..

तरी सुटेना माग अजूनी,

अन्..काळाचे अजब कोडे...! ५.


आठवणीतील क्षणांवर कधी,

प्राक्तन करी छळवाद उभे!..

लिखित प्रारब्धातूनी मग,

झोके घेती तगमगीचे दुवे...!! ६.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics