शीर्षक :- जीवन म्हणजे
शीर्षक :- जीवन म्हणजे
(काव्यांजली)
जगणे एक
सुंदर कला आहे
तरणे आहे
भवसागर...
जीवन जगताना
सत्कर्म करीत रहावे
गोंदण व्हावे
कर्माचे....!
एका श्वासाचे
अंतर असते जगणे
कीर्ती उरणे
मृत्यूनंतर... !
जन्मानंतर सुरूवातच
परावलंबनाने होते काही
उरते तरीही
नंतर...!
स्वावलंबी होण्या
प्रचंड इच्छाशक्ती असावी
भावना नसावी
परावलंबत्वाची....
नैसर्गिक शक्ती
जगण्यात अद्भुत असते
निरंतर असते
मनशक्ती...!
जन्माला येतो
आपण विशाल जगात
नवीन संकल्पनेत
जगण्यासाठी...
जग झुलवण्यासाठी
संधी प्रत्येकाला मिळते
तीही असते
डोकावत...!
जीवन जगावे
डोळे उघडे ठेवत
प्रयत्न करत
अपरंपार...
सुख मिळवणे
हाती आपल्या असते
आत्मनिर्भर असते
राहणे...
जिव्हाळा वाढवून
वाढवा माणुसकीचे नाते
जगणे होते
सुकर...
जीवन जगताना
दु:खही लागते गिळावे
सुख मिळवावे
प्रयत्नाने...
प्रज्ञा घोडके,चिंचवड,पुणे©®
'अंतरीच्या खोल डोही' या माझ्या सहाव्या काव्यांजली संग्रहातून...
