शीर्षक:- शब्द अपुरे पडती...!
शीर्षक:- शब्द अपुरे पडती...!
मन तृष्णार्त लागता
अशी अधीर या चित्ती
शब्दघन सावळेसे
जन कल्याणास होती
खळाळून वाहू देत
अवखळ शब्दझरा
होऊ देत भक्त मला
तुज साधनेत जरा
शब्दफुले उधळत
काव्य अनुराग होते
सृजनाचा ती प्रवास
जीणे प्रयाग करते
नित्य नवे अविष्कार
छंद सवंग तो आहे
बुध्दीचीही भूक तिच्या
सृजनाची बाग आहे
शब्द अमृतासमान
असे संतृप्त झेलती
शुभेच्छांच्या शृंखलांना
शब्द अपुरे पडती
असे रेशमी बंध हे
मज पुन्हा आवळती
सुज्ञ मनास प्रज्ञेच्या
शब्द अपुरे पडती
सौ.प्रज्ञा घोडके,पुणे©®
