क्षण वेचू आनंदाचे...!
क्षण वेचू आनंदाचे...!
सुखासवे दुःख आहे
सत्य एक जीवनाचे
नसे शाश्वत काहीच
नियमाने आयुष्याचे
कधी खळखळ हसू
कधी अश्रू नयनाचे
सर होत आधाराची
कधी होऊ दे कुणाचे
नको कधीच खचणे
क्षण भोगू शाश्वताचे
त्यासाठीच जीवनात
क्षण वेचू आनंदाचे
क्षणभंगूरसे आहे
इथे जीवन सार्यांचे
कधी संपेल क्षणात
नाही तेही विश्वासाचे
भरभरूनसे क्षण
करू प्रेरित मोदाचे
जरी असले मोजके
सुख शोधूया क्षणाचे
मुख खुलावे हास्याने
नको खेद गंतव्याचे
नित्य तेव्हाही वेचावे
क्षण क्षण आनंदाचे
दुःखातही पहावेच
प्रतिबिंब त्या सुखाचे
ऊन-पाऊस खेळात
इंद्रधनू क्षितिजाचे
सौ.प्रज्ञा घोडके,पुणे©®
