Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

kishor zote

Inspirational

4.0  

kishor zote

Inspirational

मूकनायक (अभंग रचना)

मूकनायक (अभंग रचना)

1 min
398


एकोणावीसशे । वीसावे साल ते ।

मूकनायक ते । पाक्षिकाचे ॥ १ ॥


एकतीस दिन | होता जानेवारी ।

अंक घरोघरी । मुंबईचा ॥ २ ॥


नाव पांडूरंग । भटकर त्याचे ।

तो संपादकाचे । काम पाही ॥ ३ ॥


शिर्ष 'मनोगत' । अग्रलेख त्याचा ।

बाबासाहेबांचा । पहिलाच ॥ ४ ॥


शाहू महाराज | आर्थिक मदत ।

मराठी भाषेत । वाचा फोडी ॥ ५ ॥


नवा संपादक । होई ज्ञानेश्वर ।

घोलप सत्वर । जोडलेला ॥ ६ ॥


तुकोबांचा होता | अभंग प्रेरणा ।

मूकनायकांना | सदोदीत ॥ ७ ॥


बाबासाहेबांची । साथ लेखणीची ।

तेरा त्या अंकाची | धारदार ॥ ८ ॥


एकोणावीस ते | उपलब्ध आज |

तळपती वीज । अंकातून ॥ ९ ॥


एकोणावीसशे । त्या वीसाला स्वल्प ।

लेखणी ती अल्प | विसावली ॥ १० ॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational