माझी शब्दफुले (शब्द अंतरीचे)
माझी शब्दफुले (शब्द अंतरीचे)
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
माझी शब्दफुले मनी उमटती,
कधी कल्पनेत कधी सत्यस्थिती.
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
परखड कधी आर्त संवेदना,
माझी शब्दफुले मांडिती भावना.
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
शब्द अंतरीचे ठेविते जपूनी,
साथ देण्या मज तत्पर लेखणी.
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
शब्द माझे सखे सदैव सोबती,
काव्यप्रवासाची अमूल्य संपत्ती.
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
माझी शब्दफुले ओंजळ काव्याची,
सजे काव्यमाला लयबद्धतेची.
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
सरस्वती बोले शब्दांची सुमने,
करिते शॄंगार लेखणी हर्षाने.
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿
माझी शब्दफुले अंतरी स्फुरली,
शब्दरजनीच्या संगे बहरली.
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿