STORYMIRROR

सचिन विश्राम कांबळे

Children Stories Children

3  

सचिन विश्राम कांबळे

Children Stories Children

सहवास

सहवास

1 min
138

नाही सोबत तुमची

मांडू कुणा पुढे दुःख

ओढ वेडी ती मायेची

वाटे ठेंगणे ते सुख


घुसमट ही जीवाची

नाही कोणाचा आधार

नसूनही मी पोरका

प्रेमासाठी का लाचार ?


कुठे काय हवं मला

भुकेलेला मी मायेस

पोळतोय हा एकांत

तरसलो त्या छायेस


चार भिंतीचा पिंजरा

कोंडतोय इथं श्वास

नाही प्रेमाची ती साद

इथं ना मायेचा वास


सजवली फुलदाणी

पण फुल कोमजलं

पोळी उद्याची भाजता

बालपण करपलं ...



Rate this content
Log in