STORYMIRROR

सचिन विश्राम कांबळे

Others

3  

सचिन विश्राम कांबळे

Others

विव्हळणारं मन

विव्हळणारं मन

1 min
7

नको घालु रे तू घाला

तुझाच रे मला आधार

तुझ्याच जोपासण्याने उभा

घेशील ना रे तू माघार

घे हवं ते ते मजकडून

तुझ्या समोर उभा मी लाचार

दाखवशील का रे एकदा दया

घेशील ना रे तू माघार

नको सांडू तू रक्त माझं

तूझ्यात ही माझ्या अंशाची धार

तान्हेला रस, भुकेला दिलं फळ

जाण ठेवून घेशील ना रे तू माघार ?

प्राण फुंकला मी तुझ्यात

कसे विसरला तू हे उपकार

कधीतरी विसावला तू छायेत माझ्या

सांगा ना घेशील ना तू माघार ?

वेदनेने विव्हळतोय मी हे जर

ऐकू आलं असतं तुला हृदया पार

जीव माझ्यात ही आहे हे समजता

घेतली असती का रे तू माघार ?

स्वार्थीपणा तुझा भोवेल तुला

तुझ्या जिवनात होईल अंधार

माझ्या सोबत तुझा ही नाश पक्का

तेव्हा काय मिळेल घेऊन तू माघार


Rate this content
Log in