STORYMIRROR

सचिन विश्राम कांबळे

Drama Others

3  

सचिन विश्राम कांबळे

Drama Others

माज

माज

1 min
174

खोट्या विश्वात वावरतोय

खोट्या मुखवट्याची वस्ती

खिशात असेल दमडी तर

नाती ही मिळतात सस्ती


प्रत्येकजण इथे भुकेलेला

फक्त पैसा आणि पैशाचा

माणसाची किंमत शून्य

कारण माज आला श्रीमंतीचा


पण कीती दिवस असा

अहंकाराचा फुगा फुगवणार

शेवटी मऊ मखमली पलंगावर नाही

तर टोचणाऱ्या लाकडावरच निजणार


माझं सगळंच माझं म्हणत

किती आणि काय काय कवटाळणार

नव्हते कधी मुळीच स्व हक्काचे

त्यावर उगाच हक्क गाजवत का मिरवणार


गमावलेला पैसा धन संपत्ती

पुन्हा सहज कमविता येते

पण गर्वात जीभेच्या धारेने कापलेली नाती

जोडता जोडता आयुष्य निघुन जाते



Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama