कुंकू
कुंकू
कुंकू पुसले भाळीचे
काढू कुणावर सूड
तूझ्या छायेत रचलेले
ढासळलेच कसे कुड ?
उष्मा पोळती दुःखाच्या
हिरावले तू माझे छत
चुर झाली स्वप्ने उद्याची
झाले ते निस्फळ व्रत
गेला तो हताश होऊन
वाट देवा तू का चुकला ?
तुज्यावरल्या श्रद्धे पायी
कुणा पुढं ना कधी झुकला
नव्हता पैका गाठीला
वारी ना कधी त्याची चुकली
पण होती आता बारी तुझी
तीही आता रे हुकली
अभाग्य ते पडलं कपाळ उघडं
लेकरं ही पडली पोरकी
कोपला का रे असा निष्ठूर ?
विध्वंसक तुझी ती गिरकी ....
✍️ 🌿सचिन कांबळे
