STORYMIRROR

Rohini Kulkarni

Drama Others

4  

Rohini Kulkarni

Drama Others

आयुष्य : एक रंगमंच

आयुष्य : एक रंगमंच

1 min
621

अंगणातील कट्ट्यावर विचारात गुंतलो होतो

वर्तमानकाळ विसरून भूतकाळात रमलो होतो

इतक्यात बाबांनी मायेने डोक्यावरून हात फिरवला

व म्हणाले लेक माझा कुठे बर हरवला..


अबोल होऊनी, शांत बसून राहिलो

नकळतच डोळ्यांनी व्यक्त होऊन गहिवरलो

बाबांनी सावरून घेतले

व बोल बाळा, असे म्हणाले..


मी म्हणालो थकलो आहे बाबा

आयुष्याच्या या नाटकात नविन वळण, वाटांच्या या फाटकात

कधी एकपात्री तर कधी सामूहिक भूमिका साकारावी लागत आहे

व्यवहारिक जगाबरोबरचे

भावनीक कोडे उलगडत नाहिये..


(बाबा म्हणाले) 

ही तर फक्त सुरुवात आहे 

आयुष्याच्या या नाटकाल 

अजून अनेक पात्रांची बरसात आहे..


कधी सुखाचे तर कधी दुःखाचे

गाणे गुणगुणूनी

आयुष्याचा प्रत्येक भाग पूर्ण करायचा आहे 

कधी काळोखात तर कधी प्रकाशात आपण जीवनाचे आपल्या 

चित्र रेखाटायचे आहे..


काही आवडत्या तर काही नावडत्या

रंगात न्हाऊनी अनेक भूमिका सादर करायच्या आहेत 

म्हणूनच आपले आयुष्य एक रंगमंच आहे.. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama