दिवाळी उत्सव
दिवाळी उत्सव
दिवाळीच्या फराळासाठी
बसली होती पंगत,
मेघाने सांगितलेल्या खेळाने
आली होती चांगलीच रंगत…..
खेळाच नाव होत
दिवाळी वेशभूषा स्पर्धा
दोन मिनीट विचार करून
कोण काय होणार ते ठरवा…..
एक एक जण येऊन पुढे
आपण कोन आहे ते सांगायचे,
आपली खासीयत सांगून
आपले मत मांडून जायचे…..
पहिल्यांदा उठली रुंजी
म्हणाली, “मी आहे करंजी,
सारणासोबत असते नेहमी मी,
बाहेरून जरी काटेरी असले तरी
आतून आहे गोड मी”…..
दुसऱ्यांदा उठली छकुली
म्हणाली, “मी आहे चकली,
खुसखुसखुशीत कुरूमकुरुम असते मी
सगळ्यांची लाडकी मी”…..
नंतर उठली कुंती
म्हणाली, “मी आहे पणती,
प्रकाशाची लावते ज्योत मी
उत्साहाचे आहे प्रतीक मी”…..
नंतर आला स्वप्नील
म्हणाला, “मी आहे कंदील,
प्रत्येकाच्या घरी असतो मी
सगळ्यांच्या मनात वसतो मी”…..
नंतर आला दादूस
म्हणाला, “मी आहे पाऊस,
लहान ते मोठयांना आवडतो मी
असा हा आनंद प्रकाशाने
भिजवणारा पाऊस मी”…..
नंतर उठली मेघा
म्हणाली, “मी आहे फुरफुर बाजा,
सगळे करतात माझ्यासोबत खुपखुप मजा”…..
नंतर उठली मनाली
म्हणाली, “मी आहे दिपावली,
या सगळयांच्या मदतीने
सर्वांच्या जीवनात आणने आनंद मी”…..
