STORYMIRROR

Rohini Kulkarni

Children Stories Drama Children

3  

Rohini Kulkarni

Children Stories Drama Children

गोधडी

गोधडी

1 min
201

अरे सापडली का गोधडी,

शोधा लवकर…

इकडे तिकडे असेल राम

थोड़ा धीर धर….


(राम) सापडली मित्रांनों सापडली

वा, मस्तच छान तर….

पण राम आता राहुदे ही जुनी पुराणी

नवीन घे आता एक तर….


किती जुनी झाली आहे,

दोरे देखील निघाले आहेत….

कशाला ही वापरत आहेस,

इतक काय यात खास आहे….


राम म्हणाला,

“अरे ती नुसती गोधडी नाही,

माझ्या आजीने दिलेली

सुंदर भेट आहे”….


“गोधडीचे निघाले असले दोरे,

तरी तिच्याबरोबर मायेची

नाळ अतूट आहे,

झाली असली जीर्ण तरी

त्यात आपुलकीचा ओलावा आहे”….


“गोधडी नुसती अंगावर घेताच

तिच्या मायेच्या ऊबीने

थंडी छो पळून जाते,

आजीच डोक्यावरून हात फिरवतेच

या विचाराने गाढ झोप लागते”….


“मी शिकायला बाहेर जाणार

म्हंटल्यावर, जागून माझ्या आजीने

ती गोधडी शिवली होती,

ती फक्त गोधडी नसून

माझ्या आजीची शेवटची आठवण आहे”….


Rate this content
Log in