एक प्रवास असा ही
एक प्रवास असा ही
बऱ्याच काळानंतर ऑफिसमधून
आठ दिवसांची सुट्टी मिळाली…
गावी जाण्याची ईच्छा,
आता पूर्ण झाली…
डोक्यात असंख्य विचारांच्या गर्दित,
मनाच्या विसाव्यासाठी निघालो होतो
घरातील माणसांसाठी आठवणीने एक,
भेटवस्तू घेत होतो…
रेल्वेत बसलो, गावाच्या
ओढीने नकळत हसलो…
रेल्वेच्या डब्बा फुल्ल भरला होता,
प्रत्येक व्यक्तीमुळे एक मेळा जणू भरला होता…
प्रत्येकाच्या नजरेत काही ना काही
वेदना जाणवत होत्या,
चेह-यावरील आशावादी
विचारांनी त्या लपत होत्या…
एक कुटुंब बसल होत,
त्यातील एका नातूने
आजोबांना विचारल, आजोबा प्रवास म्हणजे काय ?
आजोबांनी स्मित हास्य दिले व म्हणाले,
प्रवास हा नेहमी काही ना काही
सांगत जातो..
हे त्यांचे बोल ऐकून मी विचारात मग्न होऊन विचार करू लागलो
बोगदा सांगतो अंधार तात्पुरता आहे,
यातील शांतता थोडी अनुभवून घ्या,
कारण लख्ख प्रकाशाला सामोर जायच आहे…
तर घाट सांगतो,
वेडीवाकडे वळणे तेर येतातच
आपण स्थिर, धीट असलो
तर मार्ग दिसतातच…
आपल्याला स्पर्श करणारा वारा सांगतो,
आपली स्वप्ने अशी असावी की
कोणी थांबवू शकत नाही,
आपले अस्तित्व असे असावे की
आपन जरी त्या क्षणी नसू,
तरीही इतरांना ते जाणवले पाहिजे…
तर येणारा स्टॉप सांगतो,
थोडा धीर धर तुझ ध्येय तुला नक्की मिळेल
तेव्हाच तुला त्या ध्येयाचा अर्थ कळेल…
तर मागे जाणारा रस्ता सांगत असतो
जे धडून गेल ते मागेच सोडून
नवनविन अनुभवाना तयार रहा,
कारण त्यालाच आशावादी विचारांचा
सुर्यादय दिसतो, ज्याच्यात चटके सोसण्याची ताकद असते…
तर येणारे गतीरोधक
हे सांगतात की
हे आयुष्याच्या प्रवासात येणारे दुःख,
वेगाने पुढे जाण्यासाठी गरजेचे असतात
जसे ऊन असले की
सावलीचे महत्त्व कळते
तसे कष्ट, दुःख सोसले की
सुखाचे, यशाची किंमत जाणवते…
प्रवासामध्ये आपण अनेक
अनोळखी माणसांना भेटून जातो,
आणि नकळतच
क्षणभर का होईना तणावापासून मुक्त होतो…
म्हणूनच आपण म्हणतो की
जीवनाची सफर सांगणारा,
एक प्रवास असाही
ज्याच्यात आपणच चालक, वाहक आणि प्रवासीही….
