व्यथा एका पाखराची
व्यथा एका पाखराची
एका एका काडीने घरट बांधल होत,
अकस्मात वादळाने ते बेचिराख झाल होत…
चिव चिव करणाऱ्या पिल्लांनी,
मौन जणू धरल होत,
धीर देण्याऐवजी नाव टाकून दिल होत…
साथीदार जेव्हा सोबत होता,
तेव्हा येणारा प्रत्येक दिवस,
स्वर्ग वाटत होता…
तो गेल्यावर मात्र
आपल्याच माणसांच्या टोंबण्यापेक्षा,
नर्क देखील या पेक्षा
चांगला वाटू लागला होता…
येईल तो दिवस सरत सरत,
आता दिपावली देखील प्रकाशमय वाटतं नव्हती,
मनातील अंधाराची सारखी,
जाणीव करून देत होती…
आपल्याच पिल्लांची विचारपूस
दुसऱ्यांकडे करून करून,
ती परत येतील अशी
आशा धरून ठेवून
पापण्यादेखील आता वाट पाहुन थकल्या आहेत,
देवाकडे प्रेम, आपुलकीची भिक्षा मागत आहेत…
आपल्यांमधला परकेपणा,
हे थोड वेळाने उमगल
जेव्हा, आपल्या पिल्लांनी
दुसरे घरटे बांधल,
हे इतरांकडून समजल…
भूतकाळातील आठवणींमध्ये,
वर्तमानकाळ जगत आहे,
भविष्यकाळाकडे फक्त,
मोक्षाच्या दृष्टीने पाहत आहे…
