ती... तिची शक्ती
ती... तिची शक्ती
कर तुला हवं ते मर्जीने
थोडं जगून बघ स्वतःसाठी
किती राब राबणार अशी
झिजणार तू दुसऱ्यासाठी
तू स्वतःच करून घेतली आपली
किंमत शून्य कौडी मोल
कारण गुमाण सारं सोसलं
झेलले झुकून ते कडवे बोल
शिक प्रत्युत्तर करायला
अधिकार तुलाही जगण्याला
नाही मिळालं घे हिसकावून
दाखव तुझ्यातलं बळ जगाला
चल उठ आता तरी हो जागी
परवानगी तुझीच तुला लढायला
दाखव इंगा स्त्री शक्तीचा
मग कोण अडवेल मुक्त जगायला ?...
✍️🌿सचिन कांबळे
