पुरुष
पुरुष
लहानपणीच्या खेळा सारखं
टाइम प्लीज कूठे म्हणता येतं
संसाराचा गाडा ओढताना
जगणं काय असतं हे चांगलंच कळतं
सुट्टीचा दिवस आहे उद्या असं म्हणत
बायको म्हणते आहो कुठेतरी फिरून येऊ
पण महिना अखेर आहे हे कारण सांगत
इच्छा नसताना ही लागतो तिला टाळू
हिरमुसून जाऊन काही तरी पुटपुटते
म्हणते तुम्ही तर रोमँटिक च न्हाय
कुठे मोठ्या हॉटेल मध्ये जायचंय खायचंय ?
जरा इकडे तिकडे फिरू आणि पिऊ टपरीवरची चाय
वाईट वाटतं ओ..पण काय सांगवी व्यथा पुरुषाची
हौस आणि हाउस यात निवडावं लागतं हाउस
खर्चाची गणितं बांधताना करावा लागतो विचार
कधी अचानक आला तर ...अवकाळी पाऊस
एन्जॉयमेंट कोणाला नको हवा असतो
पण इंजॉयमेंटच्या नादात इंस्टॉलमेंट ना राहतो
रोमँटिक वागणं आम्हा पुरुषांना ही आवडतं
पण रोमान्स आणि फायनान्स यांचा मेळ कुठे बसतो
मन,भावना,सगळ्या इच्छा आहेत मेल्या
कारण दिसत असते ती फक्त आणि फक्त जबाबदारी
घरच्यांच्या गरजा, मुलांचं शिक्षण,आजारपण यातुन
फुरसत कुठे असते की करावी दुनियादारी....
✍️ सचिन कांबळे
