वेळ
वेळ
वेळ आयुष्याचा कसा मांडते खेळ,
दोन शब्दात कधीच लागत नाही मेळ,
क्षणात जग बदलते अशी ही असते वेळ,...
जगताना किती काही शिकवते,
कधी आनंदात हसवते,
कधी दुःखात रडवते,
तर कधी संकटावर मात करत,
जिद्दीने लढवते,...
कधी एकटे नाही सोडत कोणाला,
कधी श्रमाने तर कधी कर्माने,
सोबतच पळवते सर्वांना,..
जोडता जोडता वेळेला,
सर्वजण होतात फेल,
पण,. जगताना क्षणा क्षणाचे, महत्व शिकवते ही वेळ,...
