पप्पा...तुमच्या शिवाय मी काहीच नाही
पप्पा...तुमच्या शिवाय मी काहीच नाही
पप्पा,..तुम्हाला सांगायच खुप काही,
तुमच्या शिवाय मी काहीच नाही,..
तुम्ही....माझ्या जन्माचा अर्थ,तुम्ही,..
माझ्या आयुष्याचं सार्थ,
तुम्ही,..माझ्या भविष्याची वाट,तुम्ही,..
माझ्या साजिर्या स्वप्नाचा थाट,
तुम्ही,..माझ्या घाबरटतेची ढाल धीट,तुम्ही,..
दृष्ट काढणारी तीट,
तुम्ही,..माझ्या उजवल नशीबाची दिशा पूर्व,
तुम्ही,..अंधाराला लख्ख करणारा सूर्य,
तुम्ही..दग्दगती आग शांत करणारा चंद्र,
तुम्ही,..प्रेमाचा अथांग असा समुद्र,
तुम्ही,..निखळ प्रेमाची सुखद हवा,
तुम्ही,..माझ्या प्रत्येक जखमेची दवा,
तुम्ही,..कधीच न बदलणारा आवडीचा खेळ,
तुम्ही,..माझं लहानपण जगायला लावणारी वेळ,
तुम्हीच माझे भूतपूर्व तुम्हीच माझे भविष्य,...
तुमच्या मुळेच माझे आहे अस्तित्व,...पप्पा,..
माझं सारं विश्व सुरू तुमच्या पासून
ते तुमच्या पर्यंतच राही,...
पप्पा,.. तुमच्या शिवाय मी काहीच नाही,....
