STORYMIRROR

Raakesh More

Drama Classics Inspirational

3  

Raakesh More

Drama Classics Inspirational

किशोर दा

किशोर दा

1 min
120

गाता येत होतं त्याला 

जखमेमुळे रडत बसला 

आवाज सुरात आला 

डेव्हलप झाला कसला || 0 ||


गायन त्याने सुरू केले 

मुहूर्तमेढ रोवली 

त्याची भिन्न गायकी 

अनेकांना भोवली 

सेहगल चा भक्त मोठा 

सूर त्यास गवसला 

आवाज सुरात आला 

डेव्हलप झाला कसला || 1 ||


प्रयोग करत गेला 

यॉडलिंग त्याने आणले 

गायनाचे बदलते 

रुप त्याने जाणले 

शास्त्रीय गायन गायकीत 

कधी नाही फसला 

आवाज सुरात आला 

डेव्हलप झाला कसला || 2 ||


मोठमोठ्या गायकांना 

घरी त्याने बसवले 

कॉमेडी गायकीने 

श्रोत्यांना हसवले 

सर्व फॅन्स च्या काळजात 

सूर त्याचा धसला 

आवाज सुरात आला 

डेव्हलप झाला कसला || 3 ||


मर्दानी आवाजाची 

बात त्याची दमदार 

नाव त्याचं आदराने 

सांगतो मी किशोर कुमार 

एकोणीस शे सत्त्याऐंशी 

काळ त्यास डसला 

आवाज सुरात आला 

डेव्हलप झाला कसला || 4 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama