STORYMIRROR

Nandini Menjoge

Abstract Drama Others

3  

Nandini Menjoge

Abstract Drama Others

वादळ..!

वादळ..!

1 min
192

हे वादळ आहे...

जाळून कारणांची कपटे ही, स्पष्ट चित्र रेखत आहे !!

हे वादळ आहे...

चोखून मनाची गफलत ही, मृगजळे ही पोळत आहे !!

हे वादळ आहे...

उत्तरांची वाट निरर्थक ही, प्रश्नांचीच चाचणी मांडत आहे !!

हे वादळ आहे...

भक्कम कोवळी प्रतिमा ही, धीराने अस्तित्व चाचपडत आहे !!

हे वादळ आहे...

जखम रुधिरा पलीकडली ही, अबोल झुंजण्या सज्ज आहे !!

हे वादळ आहे...

असह्य काळजाची दडपणं ही, श्वास मोकळा शोधत आहे !!

हे वादळ आहे...

  मनाचं अंतर्मनाशी... !!

हे वादळ आहे...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract