वेड
वेड
हे छंद की वेड
जे गंधाळले मनाला..
भान हरपून जगाचे
साद देते जीवाला.. !!
मापदंड येथे हरवते
मोल परिश्रमाचे मोजताना..
असो खडतर मार्गही
स्वबळ देते गड्याला.. !!
खळगे असुद्या अपयशांचे
ठाम-धीर देते खचतांना..
संमोहन हे स्वप्नांचे
जिद्दीची वाट जिंकण्याला. !!
हे छंद की वेड...