STORYMIRROR

Nandini Menjoge

Classics

3  

Nandini Menjoge

Classics

प्रेमात विश्व जिंकले !!

प्रेमात विश्व जिंकले !!

1 min
128

नको नको त्या विश्वात अडकले मी

समोर तू होतास, तरी शोधत बसले मी..

अव्यक्त भावना जरी कृतीतून बोलत होत्या

अदृश्य कुंपणात स्वतःला थांबवत आले मी..!!


अस्वस्त करणारी ओढ अनुभवतांना,

मन अत्यानंदात नाहत होते ..

खोल मायेचा ओलावा जाणवतांना,

सहवासाने तुझ्या जग बहरत होते..!!


तुझ्या एका आर्त हाकेने,

कायमची मी तुझी झाले..

अनुभवतांना कस्तुरी दर्प प्रीतीचा,

तुझ्या प्रेमातच मी विश्व जिंकले..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics